Ad will apear here
Next
कोंडगाव येथे अकौंटन्सीचे मोफत मार्गदर्शन वर्ग
कोंडगाव (साखरपा) : येथील श्रीराम देवस्थान आणि रत्नागिरी येथील उज्ज्वला अकौंटन्सी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी मे महिन्यात कोंडगाव श्रीराम मंदिरात कॉमर्स शाखेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उज्ज्वला अकौंटन्सी क्लासेसचे संस्थापक, अकौंटन्सीविषयावर उत्तम प्रभुत्त्व असलेले आणि अनेक वर्षे हा क्लास चालवून रत्नागिरीकरांच्या मनात मानाचे स्थान मिळवणारे बाळकृष्ण जयराम हळबे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन वर्गांसाठी यावर्षी दहावीची देऊन पुढील वर्षी अकरावी वाणिज्य (कॉमर्स) शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, तसेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित राहू शकतात.  

कॉमर्समधील यशाचे मार्ग, पुढील करियर करताना कॉमर्समध्ये असलेले नवीन नवीन मार्ग, अभ्यास करतानाच्या सोप्या युक्त्या, अश्या अनेक सध्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन हळबे सर दिवसातून एक आणि सलग १५ दिवस करणार आहेत. हे मार्गदर्शन वर्ग कोकणातील मुलांसाठी मोफत असणार आहेत.

‘साखरपा परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गांचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा,’ असे आवाहन श्रीराम देवस्थानचे अमित केतकर आणि आयोजकांनी केले आहे.

नाव नोंदणीसाठी संपर्क :
विनोद केतकर : ९४२११ ८८९१७
कांचन जोगळेकर : ९४२०० ५०६००
अमित केतकर : ९४२११ ३८४५०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZUHBO
Similar Posts
‘अनुलोम’तर्फे स्वच्छता आणि दुरुस्ती अभियान साखरपा (रत्नागिरी) : अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) आणि कोंडगाव येथील श्रीराम देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडगाव येथे स्मशानभूमी स्वच्छता आणि दुरुस्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त आणि कोंडगावचे नूतन सरपंच बापूसाहेब शेट्ये, सदस्य मितेश गांधी आणि नेत्रा शिंदे उपस्थित होते
श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत संपूर्ण कोंडगावात आर्सेनिकम अल्बमचे वाटप करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोंडगाव (साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत खबरदारीचा उपाय म्हणून आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप संपूर्ण कोंडगावमध्ये विनामूल्य करण्यात येणार आहे.
३१ वर्षांनी शाळासोबत्यांची भेट संगमेश्वर (रत्नागिरी) : साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात १९८६-८७मध्ये दहावी झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या परिसरात नुकताच उत्साहात पार पडला. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या ३७ माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल ३१ वर्षांनी एकत्र येऊन शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
कोंडगावातील मोहरम : जुन्या काळातील सर्वधर्मसमभावाचे उदाहरण इथे एक विचार मनात येतो, ज्या अंगणातून श्री ग्रामदेवतेची पालखी थाटात नाचत येते, त्याच अंगणात मोहरमचा सणदेखील तेवढ्याच थाटात रंगत होता, हे त्या काळचे सर्वधर्मसमभावाचेच एक उदाहरण नव्हे का?

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language